पुण्यातली रविवार सकाळ! मस्त उशिरापर्यंत झोपून आपण नुकतेच उठलेले असतो. चहा, कॉफी पीत पेपर वाचणे चालू असते. तेवढ्यात आठवण होते, "अरेच्चा! आज रविवार. म्हणजे हिंदुस्तान मध्ये गरम गरम patice मिळतील. आपण तडक उठतो आणि गाडीवर टांग मारून patice आणायला बाहेर पडतो. एरवी रविवारी सकाळी कुठल्या कामासाठी घराबाहेर पडणं अशक्य. पण इथे प्रश्न patice चा असतो. patice साठी काय आपण कधीही तयारच असतो.
मग patice घरी आणून आपण सगळे एकत्र खायला लागतो. पुढची 5 मिनिटे एकदम शांतता. कारण कुणालाच बोलायला वेळ नसतो. सगळे patice चा आस्वाद घेण्यात मग्न असतात. मस्त कुरकुरीत cover. त्याला छान पापुद्रे सुटलेले. त्याचा चावा घेतल्याबरोबर आतून वाफा येताहेत. आतल्या बटाटा आणि मटारच्या सारणाची चव जिभेवर अलगद पसरतीये. व्वा !! कितीही वेळा खाल्लं तरी दर वेळी तितकीच मजा येते.
मग patice घरी आणून आपण सगळे एकत्र खायला लागतो. पुढची 5 मिनिटे एकदम शांतता. कारण कुणालाच बोलायला वेळ नसतो. सगळे patice चा आस्वाद घेण्यात मग्न असतात. मस्त कुरकुरीत cover. त्याला छान पापुद्रे सुटलेले. त्याचा चावा घेतल्याबरोबर आतून वाफा येताहेत. आतल्या बटाटा आणि मटारच्या सारणाची चव जिभेवर अलगद पसरतीये. व्वा !! कितीही वेळा खाल्लं तरी दर वेळी तितकीच मजा येते.
अशा आपल्या कित्येक रविवार सकाळ patice बरोबर गेल्यात. हेच patice जर घरी करता आले तर? चला. करूनच बघूया.
साहित्य: 4 ते 5 patice साठी.
1/4 Kg मैदा, पाऊण वाटी मार्गारीन किंवा डालडा, 1 टे. स्पून कॉर्न फ्लॉवर, 3 बटाटे, 1/2 वाटी मटार, 1/2 इंच आलं, 3 पाकळ्या लसूण, तिखट, मीठ, लिंबू, चवीपुरती साखर, गरम मसाला, कोथिंबीर, फोडणीसाठी तेल, मोहोरी, हळद.
कृती:
- मैद्यात मीठ, 2 टी. स्पून तेल आणि पाणी घालून घट्ट भिजवा आणि 15 मिनिटे ठेवा.
- मार्गारीन खूप फेसून हलके करून घ्या. फेसताना त्यात कॉर्न फ्लॉवर मिसळत रहा.
- भिजवलेल्या पीठाचे 3 गोळे करून त्याच्या मोठ्या पोळ्या पातळ लाटून घ्या.
- एका पोळीवर मार्गारीन लावून घ्या आणि त्यावर दुसरी पोळी ठेवा. असे तीनही पोळ्यांचे करा. सर्वात वरच्या पोळीलाही मार्गारीन लावा आणि सगळ्यांचा एकत्र घट्ट रोल करा.
- त्या रोलचे 2 ते 2.5 इंच लांबीचे तुकडे करा. त्या तुकड्यांची कापलेली बाजू side ला ठेवून उभे लांबट लाटून घ्या.
- असे तयार sheets अमेरिकेत pastry sheets या नावाने मिळतात. तसे आणले तर त्याचे योग्य आकाराचे छोटे तुकडे करून घ्या.
- ओव्हन 15 मिनिटे 200deg C (400deg F) ला preheat करा.
- सारणासाठी बटाटे उकडून कुस्करून घ्या. मटारही थोडेसे वाफवून घ्या. एका कढईत थोडेसे तेल तापवून त्यात मोहोरी आणि हळद टाका. त्यात आलं लसूण पेस्ट, कुस्करलेला बटाटा आणि मटार टाका. मीठ, तिखट, गरम मसाला, साखर टाका आणि नीट हलवून हलके परतून घ्या. gas बंद करून लिंबाचा रस टाका आणि चांगले हलवून घ्या. वरती cover येणार असल्यामुळे हे सारण पुरेसे झणझणीत करा. यामध्ये तुम्ही बटाट्या ऐवजी पनीर, कॉर्न, ढब्बू मिरची किंवा चिकन, मटण खिमा हेही वापरू शकता.
- मगाशी लाटलेल्या लांबट तुकड्यांमध्ये हे सारण अर्ध्या भागात भरा आणि उरलेला अर्धा भाग दुमडा. तीनही मोकळ्या बाजू नीट बंद करून घ्या.
- एका ओव्हनच्या ट्रे ला किंचित तेल लावून घ्या आणि त्यात patice ठेवा. ती ओव्हन मध्ये 10 मिनिटे बेक करा. मग ट्रे बाहेर काढून जरूर असल्यास patice उलटी करा आणि परत 10 मिनिटे बेक करा.
are va mast jamate ahe ki donhi karane ani lihine va keep it up we are waiting for next dish best wishes for that
ReplyDeletetondala pani sutal bar ka. ata ghari patice karun baghanarch.
ReplyDeletewow.फोटो पण एकदम मस्त, self explanatory, स्वच्छ आणि नीटनेटके.
ReplyDeleteपहिला कॉमेंट सुलूने आणि नंतरचा मी टाकलाय.
ReplyDeletepudhcya ravivari karu :)
ReplyDelete