Thursday, June 2, 2011

वदनी कवळ घेता.....

     खाणे हा आपल्या सगळ्यांचाच अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे. आपण एकत्र भेटलो की थोड्याच वेळात गाडी खाण्यावर येते. "चला आता काय खाऊया?" हा प्रश्न विचारला जातो. आणि मग घरी काय काय बनवता येईल पासून ते कुठे काय चांगले मिळते इथपर्यंत सर्व चर्चा केली जाते. या चार्चेनी आणखीनच भूक खवळते आणि मग लगेच तयारी सुरु होते.
     किंवा कधी कुणाला घरी बोलावले तर इतर plans च्या आधी जेवायला काय करायचे याचे जोरदार plans केले जातात. सुट्टीत काही दिवस सगळ्यांनी एकत्र राहायचं ठरलं तरी कुठल्या दिवशी काय खायचं त्याचे timetable सर्वात आधी केले जाते.



     तर असं हे खाणं आपल्या सगळ्यांच्या आयुष्याचा खूप महत्वाचा भाग आहे. अशाच चांगलं खाण्याच्या इच्छेतून मला ते बनवावसही वाटू लागलं आणि त्यातून माझी kitchen मधली खुडबुड चालू झाली. हळू हळू त्याची खूप आवड निर्माण झाली. सतत काहीतरी नवीन बनवत राहावं आणि लोकांना खिलवत राहावं हा छंदच बनला. योगायोगाने तेजसलाही (माझा नवरा) खाणे बनवण्याची खूप आवड असल्यामुळे बऱ्याचदा आम्ही दोघे मिळूनही खाणे (आणि लोकांना) बनवत असतो.
     आमच्या kitchen मधले हे सगळे प्रयोग, त्यामागचा विचार, त्यातले अनुभव हे सगळं तुमच्या बरोबर share करावं असं वाटलं म्हणून हा खटाटोप. या blog ला जरूर follow करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवत रहा. शिवाय हा blog पदार्थांसंबंधी असल्यामुळे नुसता वाचल्यानी  नुसतीच भूक खवळेल. त्यामुळे  हे सर्व पदार्थ घरी करून बघा आणि नक्की कळवा.

4 comments:

  1. वा! तुला लगेच चार followers. आम्ही आठ महिने ब्लॉग लिहितोय तर आम्हालाही चारच followers. ते वाढतच नाहीत.

    ReplyDelete
  2. Hope that next article will be on how to make these dishes displayed in photos. Just now it is 8.30 pm IST of 4th June 2011 and I have begun to feel quite hungry.

    ReplyDelete