Wednesday, March 7, 2018

ब्रेड पिझ्झा

     सध्याच्या आपल्या lifestyle मध्ये पिझ्झा हा पदार्थ आपल्या जेवणात वारंवार येणारा असला तरी मी लहान असताना पिझ्झा फारसा लोकप्रिय नव्हता. कित्येकांना तो माहितही नसायचा किंवा माहित असलाच तरी खाल्लेला तर नसायचाच. नंतर काही वर्षांनी भारतात Pizza Hut सारखे outlets सुरु झाले आणि हळू हळू पिझ्झा सर्वाना माहिती होऊ लागला. अर्थात तेव्हा तो अतिशय महाग मिळायचा आणि त्याचमुळे असेल कदाचित त्याचं सगळ्यांना फार अप्रूप असायचं. 
        मी असा अगदी मोजक्या वेळा तिथे जाऊन पिझ्झा खाल्लेला मला आठवतो. पण असे outlets येण्याच्या बराच आधीपासून मी पिझ्झा खाल्लेला होता. तेव्हा त्याचे ready made base मिळायला लागले होते. पण ते वाई सारख्या लहान गावात मिळत नसत. त्यामुळे कधी क्वचित पुण्याहून base आणले तर पिझ्झा बनवता यायचा. नेमकं पिझ्झा वर काय काय असतं हे नीट माहित नसल्यामुळे तेव्हा घरात त्यावर बरेच प्रयोग व्हायचे. त्यामुळे तेव्हा खूप वेगवेगळ्या toppings चे पिझ्झा खाल्ले. 
       त्याच सुमारास आमच्या घरी TV आला आणि दूरदर्शन सोडून अनेक चॅनेल्स लागायला लागले. तेव्हा संजीव कपूर यांचा 'खाना खजाना' नुकताच चालू झाला होता. त्यात त्यांनी एकदा पिझ्झा dough बनवून त्याचा base कसा बनवायचा हे दाखवलं होतं. त्यानुसार मग मम्मा घरी from the scratch असा पिझ्झा बनवायला लागली. त्याची एकदा गंमत झाली होती. मामानी पहिल्यांदाच असा dough घरी बनवला. त्याची कृती थोडी वेळखाऊ होती आणि त्यातून तिनी पहिल्यांदाच बनवला असल्यानी तयारीत खूप वेळ गेला होता. शेवटी संध्याकाळी जेवण्याच्या वेळी ती पिझ्झा बनवायला लागली. तेव्हा बाबा बाहेर गेला होता. मी आणि दादा जेवायला बसलो. प्रयोग करत करत शेवटी पिझ्झा बनला. पहिल्यांदाच बनवला असला तरी खूपच मस्त बनला होता. आणि विकतचे base आणून केलेल्या pizza पेक्षाही खूपच मस्त बनला होता. मी आणि दादा मस्त जेवलो. मग बाबा आल्यावर मामानी परत पिझ्झा बनवला पण असा पहिल्यांदाच घरी बनवल्यामुळे मम्माचा अंदाज जरा चुकला होता. या नवीन पिझ्झा वर toppings, sauce, cheese सगळंच अगदी बेतानी घातलं गेलं होतं. आज नवीन प्रयोग केला आहे त्याचे analysis करूया या बाबाच्या स्वभावानुसार त्यानी पिझ्झा खाल्यावर तो म्हणाला, "पिझ्झा ठीक झाला आहे पण यात काहीच नाहीये." आणि असं म्हणाल्यावर मम्मा एकदम हताश झाली की, "सकाळपासून तयारी करूनही हा म्हणतोय की यात काहीच नाही?"
       त्यानंतर आजपर्यंत अनेक वेळा घरी पिझ्झा केला. त्यात dough चे, sauce चे, toppings चे अनेक प्रयोग केले. मागे एकदा 'आम्ही सारे खवय्ये' मध्ये जाऊन पदार्थ दाखवण्याची संधी मिळाली तेव्हा त्यातही मी वेगळ्या प्रकारचा स्वीट पिझ्झा करून दाखवला. इथे अमेरिकेत कुठेही बाहेर किंवा पार्टी मध्ये गेल्यावर पिझ्झा नाही असे होत नाही आणि त्याचे इथे कितीतरी options आहेत. असं असूनही मी अनेकदा घरी पिझ्झा करते. माझ्या मुलांनाही मधे मधे लुडबुड करत मला मदत करायला आवडतं त्यामुळे ते जेवण आम्ही सगळ्यांनी एकत्र बनवलेलं असतं आणि त्यात खूप मज्जा येते. मम्मानी पहिल्यांदा पिझ्झा घरी बनवला त्याला आता इतकी वर्ष झाली आणि त्यानंतर कितीतरी वेळा अगदी मस्त झालेल्या पिझ्झा वर आम्ही अक्षरशः ताव मारलेला आहे पण तरीही प्रत्येक वेळेला त्या पहिल्या पिझ्झाची आठवण होते आणि "पिझ्झा मस्त बनलाय पण यात काहीच नाही." असं म्हणून आम्ही मम्माला नेहमी चिडवतो.
     मी from the scratch dough बनवून किंवा तयार dough आणून अनेकदा घरी पिझ्झा करते. तसाच काही वेळा ब्रेड पिझ्झा पण करते. हा करायला अगदीच सोपा आणि कमी वेळात होतो. चला तर मग याची रेसिपी बघूया. 

साहित्य:
6 bread slices, 1 ढब्बू मिरची, 1 कांदा, 4-5 मशरूम, 1/2 कप किसलेले चीज, 
1/4 वाटी टोमॅटो सॉस, लोणी, मिरेपूड, ओरेगॅनो.


Ingredients:
6 slice of bread, 1 green pepper, 1 onion, 4-5 mushrooms, 1/2 cup shredded cheese, 1/4 cup tomato sauce, butter, black pepper powder, oregano. 


कृती:



  • ढब्बू मिरची आणि कांदा बारीक चिरून घ्या. मशरूमचे काप करा.  
  • ओव्हन 375 deg F (190 deg C) ला preheat करा. 
  • एका ट्रे मध्ये ब्रेड चे slices मांडा. 
  • त्यावर लोणी आणि नंतर टोमॅटो सॉस लावा. 
  • त्यावर बारीक चिरलेली ढब्बू मिरची, कांदा आणि मशरूमचे काप नीट पसरा. 
  • त्यावर किसलेले चीज घाला. 
  • वरून मिरेपूड, ओरेगॅनो घाला आणि ओव्हन मध्ये 20 मिनिटे बेक करा. 




Directions:
  • Dice green pepper and onion and slices mushrooms. 
  • Preheat oven at 375 deg F (190 deg C)
  • Arrange bread slices in a tray.
  • spread butter and then tomato sauce on them.
  • Put diced green pepper, onion and sliced mushrooms. 
  • Sprinkle cheese.
  • Sprinkle black pepper, oregano and bake it oven for 20 minutes.





       पिझ्झा होत आला की त्याचा खमंग वास सगळीकडे पसरेल. वितळलेल्या आणि golden brown झालेल्या चीज मध्ये लागणारे भाज्यांचे तुकडे प्रत्येक घासाला वेगवेगळ्या स्वादाचा अनुभव देतील. यात topping म्हणून olives, अननसाचे किंवा सफरचंदाचे तुकडे, पालकची पाने, मक्याचे दाणे, किसलेले गाजर, पनीर, चिकन, अंडा भुर्जी यासारखे पदार्थ वापरता येतात. हे पिझ्झा आकाराने लहान असल्यामुळे प्रत्येक पिझ्झा एकट्यापुरता, आपापल्या आवडीनुसार बनवता येतो. याचा आस्वाद सकाळच्या नाश्ताला, संध्याकाळी चहाबरोबर किंवा जेवायला असा कधीही घेता येईल. हा ब्रेड पिझ्झा नक्की घरी करून बघा आणि
मला कसा झाला ते कळवा. 

Monday, September 19, 2016

Ice cream

प्रसंग 1:
दुपारच्या उन्हातून, खूप ट्राफिक मधून नुकतेच आपण घरी आलोय. तोंडावर थंडगार पाण्याचे हबके मारून, जोरात पंखा लावून जरा निवांत बसलोय. अजूनही तापलेलं डोकं काही थंड झाल्यासारखं वाटत नाहीये. गार पाण्याचे ग्लास वर ग्लास घशाखाली उतरले तरी अजून तहान भागात नाहीये. एवढं पाणी प्यायल्यावर आता जेवायची तर भूकच नाहीये. अशा वेळी थकलेल्या डोक्यात एक छान कल्पना येते... 

प्रसंग 2:
आज मुद्दाम ठरवून जेवायला अगदी छान बेत केलाय. सकाळपासून सगळं सामान आणण्यापासून ते तयारी करण्यापर्यंत सगळं अगदी उत्साहात चालू आहे. नेहमीपेक्षा जरा वेगळे पदार्थ असल्यामुळे आज स्वयंपाक करायलाही खूप मजा येतीये. जेवायची वेळ झाल्यावर सगळे टेबलापाशी जमून गरमागरम जेवण अगदी मिटक्या मारत, आस्वाद घेत आणि chef चे कौतुक करत खाताहेत. जेवण झाल्यावर जरा निवांत बसलो तरी आत्ताच्या झणझणीत, चटकदार जेवणाची चव अजून जिभेवर रेंगाळतीये. अशा वेळी डोक्यात एक छान कल्पना येते... 

प्रसंग 3:
मागचे बरेच दिवस अतिशय busy गेल्यानंतर आज खूपच दिवसांनी एक शांतसा weekend आला आहे. सकाळी उशीरा उठण्यापासूनच जरा आळस आला आहे. खिडकीतून बघितलं तर वाऱ्याच्या मंद झुळका येताहेत आणि बाहेरच्या वातावरणावरही एक निवांतपणा पसरला आहे. सगळा दिवस मनाच्या अशा एका तरल अवस्थेत घालवल्यावर खरंच खूप बरं वाटतंय. इतक्या दिवसानंतर असा एखादा निवांत weekend अगदी हवाच होता. संध्याकाळी शांतपणे गप्पा मारत बसलोय, एखादा मस्त movie बघतोय. अशा वेळी हा निवांतपणा साजरा करण्यासाठी डोक्यात एक कल्पना येते... 

प्रसंग 4:
आज कित्येक वर्षांनंतर सगळे एकत्र जमले आहेत. मध्ये वारंवार गाठीभेटी होत नसल्या तरीही काही वर्षांपूर्वी एकत्र घालवलेले सुंदर दिवस मनात अजूनही ताजे आहेत. एकमेकांमधली नाती इतकी घट्ट आहेत त्यामुळेच मध्ये बराच काळ गेला असला तरी आज भेटल्यावर त्याची अजीबात जाणीवही होत नाहीये. जशीजशी अजून रात्र होतीये तशा गप्पा अधिकच रंगताहेत. प्रत्येकाकडे खूप काही नवीन सांगण्यासारखे आहे. शिवाय जुने गमतीदार किस्से आठवले तर मग तर हसण्याला नुसता पूर येतोय. बरीच रात्र झालीये आणि आता जेवूनही बराच वेळ होऊन गेलाय. अशा वेळी कुणाच्या तरी सुपीक डोक्यात एक छान कल्पना येते... 

Strawberry, blueberry ice cream with strawberry sauce

     आत्तापर्यंत ती कल्पना काय असणार याचा अंदाज आला असेलच. तुमच्याही डोक्यात हा विचार अनेकदा डोकावून गेला असेल. Ice cream... थंड, मुलायम, creamy, जिभेवर ठेवताच वितळणारे, घशापासून पोटापर्यंत आणि मनालाही गारेगार करणारे ice cream. या आणि अशासारख्या अनेक घटना साजऱ्या करायला ice cream सारखा दुसरा पदार्थ नाही. याच्या इतक्या अगणित flavours आहेत. शिवाय वर कुठले nuts, फळांचे तुकडे, सॉस, चॉकलेट घालायचे, मिल्कशेक मध्ये घालून मस्तानी करायची, केक, जेली, फळे घालून त्याचे trifle pudding सारखे काही dessert करायचे की नुसत्याच स्वादाचा आस्वाद घ्यायचा असे अनेक पर्याय असून शकतात. प्रत्येकाच्या आवडीनुसार त्यात बदल करता येतात. Ice cream म्हणजे बहुतेकांचा अगदी weak point असतो. तुम्ही माझ्यासारखे असाल तर कुठल्याही ऋतू मध्ये, दिवसातल्या कुठल्याही वेळेला ते खाऊ शकता. 



Chocolate, vanilla ice cream bars


     आजकाल ice cream चे अनेक प्रकार विकत मिळतात. पण तरी मी अनेकदा ते घरी करते. याला अनेक कारणे आहेत. एकतर घरी आपण स्वतः करण्याचा आनंद मिळतो. त्यात अनेक नवीन प्रयोग करून तुमची स्वतःची अशी काही नवीन combinations करू शकता. मला स्वतःला बाहेरच ice cream जरा जास्त गोड, फेसाळ आणि त्यामुळेच थोडं कमी थंड वाटतं. शिवाय बाहेरच्या ice cream मध्ये ज्या प्रमाणात क्रीम असतं त्यामुळे ते वारंवार खाऊ शकत नाही. त्यामुळे घरी ice cream करण्याची मज्जाच वेगळी. 
     चला तर मग याची सोपी रेसिपी बघूया. 







साहित्य:
2 कप (1/2 लिटर) दूध, 1/2 कप क्रीम, 1/3 कप साखर (फळांचा पल्प वापरणार असाल तर 1/4 कप साखर), 1 1/2 टी स्पून कॉर्न स्टार्च, 1 चिमूट GMS powder, 1 चिमूट stabilizer powder
विविध flavours बनवण्यासाठी: (खालीलपैकी काहीही)
1/2 कप फळांचा पल्प, 1 टी स्पून vanilla extract, 1 टेबल स्पून कोको पावडर, 2 टी स्पून instant coffee पावडर, 1/4 कप घरी बनवलेला स्ट्रॉबेरी सॉस, 1 टेबल स्पून काजू, पिस्ता, बदाम यांची भरड पावडर, 2-3 चिमूट केशर, 1/4 टी स्पून वेलदोडा पावडर यापैकी काहीही.
सजावटीसाठी:
ताज्या फळांचे तुकडे, nuts, किसलेले चॉकलेट, चॉको चिप्स, rainbow sprinkles, स्ट्रॉबेरी सॉस, चॉकलेट सॉस. 

Ingredients: 2 cup( 1/2 liter) milk, 1/2 cup heavy cream, 1/3 cup sugar (1/4 cup sugar if using fruit pulp), 1 1/2 teaspoon cornstarch, 1 pinch GMS powder, 1 pinch Stabilizer powder.
For different flavours: (anything from list below)
1/2 cup fruit pulp, 1 teaspoon vanilla extract, 1 tablespoon cocoa powder, 2 teaspoon instant coffee powder, 1/4 cup homemade strawberry sauce, 1 tablespoon coarse nut powder, 2-3 pinches of Kesar, 1/4 teaspoon cardamom powder.
For Garnishing:
fresh fruites pieces, nuts, grated chocolate, chocochips, rainbow sprinkles, strawberry sauce, chocolate sauce


कृती: 
  • खोलीच्या तापमानाच्या निम्म्या दूधात कॉर्न स्टार्च घालून गुठळ्या होणार नाहीत अशा प्रकारे नीट मिसळा. 
  • ते मिश्रण उकळा आणि त्यात साखर घाला. 
  • मिश्रण जरा थंड झाले की त्यात उरलेले दूध, क्रीम, GMS आणि stabilizer powder आणि वरीलपैकी कुठलीही flavour घाला आणि मिक्सर मधून काढा. कुल्फी करायची असल्यास शिवाय 1/4 कप खवा घाला किंवा आटवलेलं दूध वापरा.   
  • Ice cream maker असेल तर मिश्रण त्यात टाकून घट्ट होऊ द्या.
  • नसेल तर मिश्रण फ्रीजर मध्ये ठेवा. अर्धवट घट्ट झाले की परत मिक्सर मधून काढा आणि फ्रीजर मध्ये ठेवा. ही कृती 2-3 वेळा करा. यामुळे ice cream मध्ये बर्फ न लागता ते एकसारखे मुलायम लागते. 
  • Ice cream खाण्यापूर्वी 2 मिनिटे आधी फ्रीजर मधून काढून ठेवा म्हणजे त्याचा छान गोळा बनेल. 
  • सजावटीसाठी वरून ice cream च्या flavour नुसार आणि तुमच्या आवडीनुसार ताज्या फळांचे तुकडे, nuts, किसलेले चॉकलेट, चॉको चिप्स, rainbow sprinkles, स्ट्रॉबेरी सॉस, चॉकलेट सॉस यापैकी काहीही घालून त्याचा आस्वाद घ्या. 

Directions:

  • Add cornstarch in half of the room temperature milk and mix well to avoid lumps.
  • Boil this mixture and add sugar.
  • Let it cool and then add remaining milk, heavy cream, GMS and Stabilizer powder and any flavour ingredient and blend it in blender. To make Kulfi add 1/4 cup Mawa or use thickened milk.
  • If you have ice cream maker pour this mixture in it to set.
  • Otherwise put it in a freezer. Blend it again when half set and put it in a freezer. Repeat this 2-3 times to get ice free soft consistency.
  • Remove ice cream from freezer 2 minutes before serving to get nice scoop.
  • Garnish it with fresh fruites pieces, nuts, grated chocolate, chocochips, rainbow sprinkles, strawberry sauce, chocolate sauce etc. according to the flavour of ice cream and your choice.  


     हे ice cream केल्याकेल्या इतकं मस्त दिसत असलं तरी ते घट्ट होईपर्यंत त्याची वाट बघत, टुकत बसावे लागणार. तयार झाल्यावर याचा एक चमचा तोंडात टाका आणि तो मधूर, थंडगार अनुभव मनात साठवत रहा. एकदा हे ice cream तुम्ही खाल्लेत की बाहेरच्या आणि घरी केलेल्या ice cream मधला फरक तुम्हालाच जाणवेल आणि तुम्ही नक्की वारंवार घरीच कराल. ही कृती काही फार अवघडही नाही. तुम्ही हे मुलांबरोबर करू शकाल. त्यांच्या आवडीचा पदार्थ त्यांनी बनवला याचा त्यांनाही आनंद होईल. शिवाय आपण यात नक्की काय काय आणि किती प्रमाणात घातलाय हे तुम्हाला माहीत असल्यानी तुम्ही ते योग्य प्रमाणात खाऊ शकाल. एकदा ice cream करून फ्रीजर मध्ये ठेऊन द्यायचं आणि अधून मधून वाटीत थोडंसं घेऊन त्याचा आस्वाद घ्यायचा यासारखं दुसरं सुख नाही. मग कुठला प्रसंग ice cream नी रंगतदार करताय? कसं बनलं ते मला कळवायला विसरू नका.

Alphonso Mango ice cream with fresh mango pieces
Cashew, Almond, Keshar Kulfi


Dark Chocolate ice cream with chocolate sauce




Tuesday, June 24, 2014

Grilling

     भारतात राहून आपल्याला ऊन असणारा ऊबदार दिवस याचे फारसे महत्व नसते. वर्षातला अनेक काळ अशा प्रकारचे किंवा खरं तर अतिशय गरम हवामान असल्यामुळे आपण त्यात काही विशेष मनात नाही. पण अमेरिकेत मात्र अशा प्रकारचा दिवस उजाडला की लोकं वेड्यासारखी खुश होतात. रस्त्यावर, दुकानात कोणी अनोळखी माणसे भेटली तरी एकमेकांशी फक्त एवढ्याच विषयावर बोलतात. मी अमेरिकेत पहिल्यांदा मार्च महिन्यात आले आणि त्यानंतर थोड्याच दिवसात हवा एकदम मस्त झाली. आणि मग उन्हाळा चालू झाला. तेव्हा गरम हवेसाठी वेड्या होणाऱ्या लोकांकडे बघून मला गंमत वाटायची. वाटायचे, "त्यात काय एवढे !!!" मग त्यानंतर मी एक हिवाळा इथे काढला आणि "Ohh !!! What a wonderful sunny day!" याचा अर्थ मला पुरता कळला. वर्षातला बराच काळ कडाक्याच्या थंडीत काढल्यावर त्या उन्हाळ्याचे एवढे कौतुक नाही केले तरच नवल. त्यामुळे अमेरिकेतली लोकं उन्हाळ्यात शक्य तितका वेळ घराबाहेर घालवतात. अचानक बागांमधे लोकांचे थवेच्या थवे दिसायला लागतात. फिरणे, पोहणे, ट्रीपला जाणे, camping करणे, बोटीतून फिरणे, मासे पकडायला जाणे यासारखे अनेक उद्योग इथे उन्हाळ्यात सुट्टीच्या दिवशी चालतात. या सगळ्यातला अजून एक अत्यंत महत्वाचा उद्योग म्हणजे Grilling किंवा Barbecue.
     इथे बहुतेक सगळ्या पार्क मधे grills लावलेल्या असतात. आपण कच्चे पदार्थ आणि कोळसा घेऊन गेलं की grilling करता येतं. तिथे जवळपासच बसायला bench, table, शिवाय नंतर गरम कोळसे टाकायला वेगळे पिंप अशाप्रकारची सगळी सोय असते. बऱ्याच लोकांकडे स्वतःच्याही grills असतात. मग त्या कधी बागेत, समुद्रकिनारी नेऊन किंवा मग अगदी घराच्या मागच्या मोकळ्या जागेत, बाल्कनी मधे मांडून लोकं त्याची मजा लुटतात. उन्हाळ्यात बागेत फिरायला गेलं तरी कुठूनतरी धूराचा आणि भाजल्या जाणाऱ्या पदार्थांचा खरपूस वास येतो.
     हा प्रकार साधारण आपल्याकडच्या हुरडा पार्टी सारखा. म्हणजे सगळ्या मित्रपरिवारानी एकत्र येउन बाहेर मोकळ्यात जेवायचं. असे grilling केलेले पदार्थ किती रुचकर, खमंग लागतात हे शब्दात वर्णन करून सांगणे फार अवघड आहे. ते खाऊन त्याचा अनुभवच घ्यायला हवा. प्रत्यक्ष आगीवर किंवा कोळशाच्या धगीत भाजलेले ते पदार्थ वरून अतिशय खरपूस आणि त्या गरमा गरम पदार्थाचा चावा घेतल्यावर आतून मऊ, लुसलुशीत, रसाळ आणि खूप स्वादिष्ट!! पदार्थाला चवीपुरतं मीठ आणि इतर मसाले वगैरे लावलं असलं तरी भाजल्यामुळे त्या घटक पदार्थाची मूळ चव जास्त प्रकर्षाने लागते. भाजल्यामुळे त्यात एक प्रकारचा गोडवा येतो. त्यामुळे वरून फार काही न लावलेले पदार्थही केवळ भाजल्यामुळे अप्रतिम लागतात. आणि असे पदार्थ सगळ्या वयाचे लोकं आवडीने खाऊ शकतात. 

     Grilling केलेले पदार्थ इतके मस्त लागण्याची अजूनही काही करणं आहेत. खरं तर अशा प्रकारे बाहेर, मोकळ्या हवेत, निसर्गाच्या सानिध्यात बसून जेवण करण्याने त्या पदार्थांची चव दहा पटींनी वाढते. शिवाय मित्र, मैत्रिणींबरोबर हसत, गप्पा मारत जेवण्यात खरी मजा. मुळात सगळे पदार्थ एकदम तयार होत नसल्याने हळू हळू एकेक पदार्थ जसा भाजला जाईल तसा निवांत, चव घेत खाता येतो. नुसत्या आगीवर भाजलेले पदार्थ मस्त लागतातच पण कोळशावर भाजलेल्या पदार्थांची चव काही औरच! त्याला कोळशाचा इतका मस्त वास लागतो की अशा पदार्थांची चटक नाही लागली तरच नवल.
     Grilling करून खाणे म्हणजे खरं तर 'History repeats' या प्रकारात मोडते. आदिमानवाच्या काळात आगीचा शोध लागल्यावर तोही असेच पदार्थ भाजून खायला लागला तेव्हा त्याला किती मजा आली असेल हे आज आपण अनुभवू शकतो. 

     आम्हाला दोघानाही grilling केलेले पदार्थ अतिशय आवडतात. आम्ही काही वर्षांपूर्वी अमेरिकेच्या पूर्व भागात राहत होतो तिथे हिवाळ्यात बर्फ पडत असल्याने फक्त उन्हाळ्यात grilling करता यायचं. त्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या शेवटी, "आता हे शेवटचे!" असे म्हणून आम्ही अनेकदा grilling केले. आता California मध्ये थंडी बेताची असल्यामुळे आम्ही हिवाळ्यातही grilling करण्याचा माज करतो. 
     पदार्थ भाजून खायचे म्हणाल्यावर आपली गाडी मक्याचे कणीस, वांग्याचे भरीत किंवा फार तर भाकरी, पापड इथेच अडते. आम्ही त्यात वेगवेगळ्या चवींचे तरतऱ्हेचे पदार्थ बनवून बघितले. Grilling करताना अनेक भाज्या, meat, फळं असं भाजल्याने त्यांच्या वेगळ्या चवी आणि पोत यांनी खूप मजा येते. आम्ही बनवलेल्या काही पदार्थांच्या पाककृती मी सांगणार आहे. 


भाज्या:






मशरूम: (Mushrooms)
1. मशरूम अर्धे चिरून त्याचे मोठे तुकडे करा. त्यात थोडसं तेल, मिरपूड, लिंबू, मीठ, ओरेगानो घालून चोळा आणि 15 मिनिटे marinate करा. नंतर grill करा. 
2. Stuffed मशरूम करण्यासाठी मशरूमचे देठ काढा आणि त्याला लिंबू, मीठ लावून 15 मिनिटे marinate करा. सारण करण्यासाठी मक्याचे दाणे, पनीर किंवा मटार अगदी बारीक करून घ्या आणि त्यात तिखट मीठ, गरम मसाला घालून नीट मिसळून घ्या. मशरूमच्या पोकळीमधे सारण भरा आणि grill करा. 

(1. Cut mushrooms in big pieces. Add oil, crushed black pepper, lime juice, salt, oregano and marinate for 15min. Grill it.
2. For stuffed mushrooms, remove mushroom stems and marinate it with salt and lime juice for 15 min. For stuffing, crush corn, peas or Paneer and add chili powder, salt, Garam masala. Stuff this mixture in mushrooms and grill it.) 


Tomato:
छोटे tomato (cherry tomato) असतील तर अख्खे घ्या नाहीतर tomato चे मोठे तुकडे करा. त्याला मीठ, तेल, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली basil ची पानं लावा आणि grill करा. 

(Take cherry tomatoes or cut tomatoes in big pieces. Marinate it with salt, oil, finely chopped garlic, finely chopped basil leaves and grill it.)




कांदा, ढब्बू मिरची, फ्लॉवर: (Onion, green pepper/ capsicum, cauliflower)

या भाज्यांचे मोठे तुकडे करा. त्याला मीठ, लिंबू, गरम मसाला, तिखट लावून 15 मिनिटे marinate करा आणि मग grill करा. 

(Cut these vegetables into big pieces. Marinate it with salt, lime juice, Garam masala, chili powder for 15 min and then grill it.)



Asparagus:

1. Asparagus चे खालचे जाड देठ काढून टाका आणि त्याला तेल, मीठ, मिरपूड चोळा. 15 मिनिटांनी grill करा. 
2. Asparagus ला बारीक चिरलेला लसूण आणि सोया सॉस लावा आणि 15 मिनिटांनी grill करा. 

(1. Remove thick part of Asparagus which is hard to chew. Marinate it with oil, salt, crushed black pepper for 15 min. and grill it.
2. Marinate Asparagus with finely chopped garlic and Soy sauce for 15 min. and grill it.) 








Veg सीख कबाब / कटलेट: (Veg Seekh Kabaab / Cutlet)



एका कढईत तेल गरम करा आणि त्यात आलं पेस्ट, हिरवी मिरची आणि चिरलेल्या भाज्या (गाजर, घेवडा, मटार, कोबी, भोपळा) घालून परता. हे मिश्रण थंड झालं की मिक्सर मधून बारीक करा. कढईत थोडं हरभरा डाळीचे पीठ हलकं भाजा आणि त्यात भाज्यांचे मिश्रण, उकडलेला बटाटा, मीठ, गरम मसाला, मिरपूड घालून नीट मिसळून घ्या. एका सळईवर (Skewer) हे मिश्रण घट्ट दाबून लावा आणि त्यावर aluminium foil गुंडाळा. हे grill वर सगळीकडून भाजा आणि कोथिंबीर, पुदीना चटणीबरोबर खा. 

(Heat oil in a pan and add ginger paste, green chili, and chopped vegetables like carrot, beans, peas, cabbage, pumpkin etc. and saute. When the mixture gets cool grind it. Dry roast chickpea flour and add vegetable mixture, mashed potato, salt, Garam masala, crushed black pepper. Mix it well. Make a roll of a mixture and insert a skewer in it. Roll aluminium foil around it and grill it from all sides. Serve with cilantro / coriander, mint Chutney.)


बटाटे, पनीर, चिकन, फिश, Prawns: 
वरील पदार्थांना खालीलपैकी कोणताही स्वाद चांगला लागतो. 

 

 

तंदूर:
दह्याचा चक्का लावा. त्या घट्ट दह्यात आलं-लसूण पेस्ट, तंदूर मसाला, तिखट, लिंबू, मीठ, तेल, थोडासा गरम मसाला टाका आणि हे मिश्रण घटक पदार्थाला चोळून अर्धा तास marinate करा. नंतर grill करा. 

(Take hung curd in a bowl and add ginger- garlic paste, Tandoor masala, red chili powder, lime juice, salt, oil, very little Garam masala. Marinate ingredients in this mixture for 1/2 hour and then grill it.)


पुदीना चटणी:
पुदीना, कोथिंबीर, आलं, लसूण, हिरवी मिरची, लिंबू, मीठ यांची चटणी बनवून घटक पदार्थाला लावा. अर्धा तास marinate करून नंतर grill करा. 

(Take mint leaves, cilantro / coriander leaves, ginger, garlic, green chili, lime juice, salt in a grinder and make a fine paste. Marinate ingredients in this mixture for 1/2 hour and then grill it.)


Hickory sauce / Barbecue sauce:
घटक पदार्थाला यापैकी कुठलाही सॉस आणि लागल्यास थोडेसे मीठ चोळून अर्धा तास marinate करा आणि नंतर grill करा. 

(Marinate ingredients in these sauces for 1/2 hour and grill it.)


Italian herbs: 
घटक पदार्थाला rosemary, oregano, basil, thyme याप्रकारची herbs, मीठ, मिरपूड, तेल चोळा आणि अर्धा तास marinate करा. नंतर grill करा. 

Marinate ingredients in salt, crushed black pepper, oil and herbs like rosemary, oregano, basil, thyme for 1/2 hour and grill it.


Chinese: 
बारीक चिरलेलं आलं-लसूण, सोया सॉस, चिली सॉस, व्हिनेगार, मीठ, तेल यांचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण घटक पदार्थाला चोळून अर्धा तास marinate करा. नंतर grill करा. 

In a bowl add finely chopped ginger, garlic, Soy sauce, Chili sauce, vinegar, salt, oil and mix it well. Marinate ingredients in this mixture for 1/2 hour and grill it.


Creamy sauce:
क्रीम (किंवा थोडसं दूध), चीज, काजू किंवा बदाम, मिरपूड, मीठ, थोडासा लसूण याची पेस्ट करून ती घटक पदार्थाला लावा. अर्धा तास marinate करून नंतर grill करा. 

Take cashew nuts or almonds, cheese, cream or milk, crushed black pepper, salt, garlic and make a paste. Marinate ingredients in this mixture for 1/2 hour and grill it.


Pesto कटलेट:
बेसिल, बदाम, ऑलिव्ह oil, लसूण, मीठ, मिरपूड हे बारीक वाटून त्यांची चटणी (Pesto) तयार करा. घटक पदार्थाचा बारीक खिमा करून त्यात pesto, चवीनुसार मीठ घाला आणि नीट मिसळून घ्या.  हे मिश्रण 15 मिनिटे marinate करा. त्याचे कटलेट बनवून grill करा. 
ब्रेड भाजून त्याला pesto लावा. त्यावर कटलेट, चीज, grill केलेल्या कांदा, tomato च्या चकत्या ठेवून sandwich बनवा. 

(To make Pesto take basil leaves, almonds / pine nuts, olive oil, garlic, salt, crushed black pepper in a grinder and make fine paste. Grind ingredients and add Pesto, salt and mix it well. Marinate the mixture for 15 min. Make patties and grill them. 
Spread Pesto on a toasted bread slice. Arrange Grilled patty, cheese, grilled slices of onion, tomato and make a sandwich.)




फळं:
अननस, पीच, सफरचंद या फळांचे मोठे तुकडे करून नुसतेच भाजले तरी मस्त लागतात. शिवाय हवे असल्यास त्या तुकड्यांना लिंबू, मीठ, साखर चोळून grill करा. त्यामुळे त्यांच्या चवीत अजूनच रंगत येते. हलकी भाजलेली फळं Vanilla ice cream बरोबरसुद्धा मस्त लागतात. 

(Cut big pieces of fruits like pineapple, peach, apple and grill it as it is. Or marinate it in lime juice, salt and sugar for 5 min and grill it. You can serve it with Vanilla ice cream.)



     या आणि अशासारखे असंख्य पदार्थ तुम्ही grill करू शकता. तुकडे लहान असतील तर skewer वर लावून छान भाजता येतात. शिवाय या सगळ्या भाजलेल्या पदार्थांपासून काही नाविण्यपूर्ण पदार्थही बनवू शकता. म्हणजे  grilling केलेले पदार्थ घालून केलेलं sandwich, भात किंवा सलाड. भाज्या घातलेला भात aluminium foil वर पसरून grill वर ठेवला तर त्याला मस्त धुरावलेला, कोळशाचा वास येतो आणि असा भात अप्रतिम लागतो. अशा या grill केलेल्या मेजावानी बरोबर तुम्ही सूप, ताजी फळं, ice cream खाऊन परिपूर्ण, अत्यंत चविष्ट आणि कमालीच्या पौष्टिक जेवणाची मजा लुटू शकता. तुमच्याकडे grill  नसेल तर हेच सगळे पदार्थ तुम्ही oven किंवा अगदी तव्यावरही करू शकाल. त्यात प्रत्यक्ष आगीवर किंवा कोळशावर भाजल्याची मजा जरी आली नाही तरी ते पदार्थही खूप चवदार लागतात. घरी नक्की करून बघा आणि तुमचा अभिप्राय कळवा. 

Saturday, May 10, 2014

Mother's Day Special - कोथिंबीरीच्या वड्या (Traditional Maharashtrian Cilantro Snack)


     माझ्या आणि मम्माच्या खाण्याबद्दलच्या आठवणी ती मला रोज न कंटाळता जेवायला भरावयाची तेव्हापासूनच्या आहेत. न कंटाळता अशासाठी म्हणाले कारण मी तेव्हा जेवायला सुमारे 1 ते 1.5 तास लावयचे. त्यामुळे मला दूध देणे, जेवण भरवणे हा माम्मासाठी एक मोठा उद्योगाच असायचा. शेजारच्या काकू तर मम्माला म्हणायच्या की, "तिला दूध देण्याआधी तुम्ही स्वतः कपभर दूध पीत जा." मी मुळात खूप सावकाश जेवायचे आणि त्यातून माझ्या बऱ्याच आवडी निवडी होत्या. त्यामुळे "अगं, पटापट खा. रेंगाळू नको. नुसती तंद्री लावून बसू नको." अशी वाक्ये सतत कानावर पडायची. "आवडत असलेला पदार्थ आवडून खायचा आणि आवडत नसलेला पदार्थ न आवडून खायचा" असा आमच्या घरातला नियम होता. तो नियम मलाच सर्वात जास्त जाचक होत असल्यामुळे माझी कुरकुर असायची. या सगळ्यावर उपाय म्हणून मम्मा बरेच नवीन, fancy पदार्थ करायची. ते करताना मला उल्लू बनवण्याची पूर्ण खबरदारी घेतली जायची. म्हणजे कटलेट, पाव भाजीच्या नावाखाली कुठल्याही भाज्या खपवणे, चॉकलेट केक च्या नावाखाली नाचणीचे पीठ घातलेला केक खायला घालणे किंवा वांग्याची मसालेदार भाजी ही कशी veg चीकन असते हे पटवणे असे प्रकार सर्रास व्हायचे. नंतर पुढे माझ्या या सगळ्या सवयी बदलल्या आणि मी सगळं आवडून खायला लगले. पण तरीही जेवतानाची ती सगळी वाक्य बदलली नाहीत. फक्त आता त्या वाक्यात माझ्याऐवजी आरवचं नाव असतं आणि ती वाक्य आता मम्मा ऐवजी मी म्हणते एवढंच. पण मम्माकडून मी जसे उत्तम पदार्थ करायला शिकले तसच मुलाला उल्लू बनवायलाही शिकले असणार. 
     मी आज जे काही पदार्थ बनवते त्यातले बरेचसे मी मम्मा कडून शिकलेले आहे. आणि नुसतेच पदार्थ शिकले असं नाही तर मुळात ते बनवण्याची आवड, त्यातले perfection, त्यासाठी लागणारा सराव, नवीन प्रयोग करून बघण्याची इच्छा हे तिच्याकडून मिळाले आहे. लहानपणी एखादा पदार्थ आज मी करणार असं मी म्हणाल्यावर मला तिनी कधी नुसता तो पदार्थ शिकवला नाही तर त्यासाठी लागणारी तयारी करण्यापासून ते नंतर सगळं जागच्या जागी ठेवून ओटा पुसून घेण्यापर्यंत सगळं मी करावं असा तिचा आग्रह असयचा. आणि एवढं सगळं करूनही परत वेळेत जेवायला वाढलं पाहिजे यासाठी कशा प्रकारे वेळेचं नियोजन करायचं हे सुद्धा तिनी शिकवलं. शिवाय त्या पदार्थात घटक टाकताना चवीबरोबरच पौष्टीकतेचाही विचार केलेला असायचा. त्यामुळे नुसत्या पाककृतीच नाही तर एकूणच पदार्थ बनवण्याची पद्धत आणि त्यामागचा विचार हे सगळच मी नकळत शिकत गेले. 
     माझं सगळ लहानपण वाई मध्ये गेलं. महाबळेश्वरला जाताना वाटेत वाई लागत असल्यामुळे जाता जाता थोड्या वेळासाठी आमच्याकडे डोकावणारे चिक्कार पाहुणे आमच्याकडे येत असतात. अशा अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी खायला किंवा जेवायला  काय करायचं याच्या असंख्य कल्पना माम्माकडे आहेत. आणि एकदम बरीच लोकं जेवायला आली आहेत असेही अनेकदा होत असल्याने किती जेवण लागेल याचा खूप चांगला अंदाजही तिला आहे. एकूणच पदार्थ बनवणे आणि लोकांना खायला घालणे तिला अत्यंत आवडते. मी माझ्याकडे इथे अमेरिकेत कोणी येणार असले की आदल्या दिवशी तिला call करून काही ideas घेते. 
     माझ्या लहानपणी वाईत फारशी हॉटेल नव्हती आणि जी होती तिथे आम्ही जाऊन खाऊ शकू इतकी बरी नव्हती. त्यामुळे जे काही वेगळे पदार्थ खायचे आहेत ते मम्मा घरीच बनवायची. आम्ही फर्माइश केलेले नवीन पदार्थ बनवण्यात मम्मा एकदम पटाईत होती. दर रविवारी "काहीतरी वेगळं आणि मस्त" या अटीत बसेल असं बनायचं. आमच्या प्रत्येक वाढदिवसाला खास मेनू तर असायचाच पण शिवाय दरवर्षी माझ्या डोक्यात केक साठी नवीन idea यायची. त्यानुसार मम्मा वेगवेगळ्या आकाराचा केक बनवायची. नंतर ती cake च्या order घ्यायला लागली. कित्येक वर्ष ती खूप विविध आकाराचे आणि theme चे cake बनवून द्यायची. तिच्याबरोबर cake चे icing, decoration करणे हा माझा आवडता छंद होता. कधी tv वर नवीन पदार्थ पहिला की तो मम्मा करून बघयची. त्यामुळे Pizza, Chinese, Sizzler, रुमाली रोटी, पंजाबी भाज्या, चिकन बिर्याणी यासारखे अगणित पदार्थ मी हॉटेलमध्ये खायच्या कितीतरी आधीपासून घरी खात होते. आमच्याकडे काही कार्यक्रम असला की माझ्या मैत्रिणी किंवा मम्माच्या मैत्रिणी या वेळी मम्मानी काय नवीन केलं असेल म्हणून वाट बघायच्या. 
     वाईत हॉटेल नाही म्हणून सगळे पदार्थ घरी करून बघण्याला सुरुवात झाली असली तरी त्याला फक्त हे एकच कारण नव्हतं. घरी आपल्या आवडीनुसार त्या पदार्थाची चव सुधारता येते. त्यात वापरलेले घटक पदार्थ उत्तम दर्जाचे आहेत हे आपल्याला माहीत असतं. पदार्थ सर्वांना पुरेसे आणि स्वस्तात होतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ते आपण स्वतः बनवण्याचा आनंद मिळतो. मला आठवतंय की लहानपणी कित्येकदा काही नवीन पदार्थ बनवायचा ठरला की घरातले सगळेजणं त्यात सामील व्हायचे. आधीची मदत करण्यापासून ते नुसतीच लुडबुड करून, अधून मधून वास घेत, अजून शिजलं की नाही ते बघण्यापर्यंत सगळ्या कामात आम्ही सगळे बुडून गेलेलो असयचो. अशा एकत्र घालवलेल्या कित्येक रुचकर संध्याकाळी माझ्या आठवणीत आहेत.
     उन्हाळ्याच्या सुट्टीतसुद्धा वाड्यातले सगळे एकत्र येऊन पापड, कुरडया, पापड्या करायचे तेव्हा खूप मज्जा यायची. याशिवाय मम्मा बेदाणे, बटाट्याचे वेफर्स सुद्ध्या घरी करयची. या सगळ्यात तिला मदत करणे हा माझा अत्यंत आवडत उद्योग होता. 
     अनेक नवीन पदार्थ करून बघणे आणि त्यात प्रयोग करणे हे आमच्या घरात नेहेमी चालू असल्यामुळे काही फसलेल्या प्रयोगांचे गमतीदार किस्सेही आहेत. एकदा मम्मा नुकतीच icecream शिकली होती आणि ते घरी करून बघणार होती. असे नवीन काही करणार म्हणाल्यावर बाबाची प्रयोगशीलता खूपच उफाळून येत असे. (अर्थात त्यातूनच खूप नवीन मस्त पदार्थ बनले हे मान्य करायला हवे.) तर icecream च्या वेगवेगळ्या flavours करून बघू म्हणून बर्फाच्या tray मध्ये प्रत्येक कप्प्यात वेगळ्या चवीचे icecream बनवून सेट करत ठेवले. मुळात icecream खायला मिळणार म्हणून आम्ही खूप टुकत बसलो होतो. आणि त्यातून एवढी वेगवेगळी icecreams केली म्हणाल्यावर तर खूपच खुशीत होतो. खूप वाट बघून शेवटी icecream सेट झाल्यावर खायला घेतलं आणि लक्षात आलं की ते भलतंच घट्ट बनलं आहे. म्हणजे नुसतं गोठून घट्ट नाही तर काहीसं पिठूळ, वडीसारखं. ते खाणं अशक्य होतं म्हणून शेवटी हिरमुसून ते बेसिन मध्ये फेकून दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बघतो तर ते icecream बेसिन मध्ये तसंच्या तसंच. ते बघून मात्र आमची हसता हसता पुरेवाट झाली. झालं होतं असं की नेमकं त्यावेळी icecream मध्ये घालण्यासाठी आणलेल्या मिल्क पावडर मध्ये बहुतेक आधीच corn starch घातलेला होता. त्यामुळे icecream चं सगळं प्रमाण बिघडलं आणि त्याचा न वितळणारा घट्ट ठोकळा बनला होता. त्यानंतर अक्षरशः हजारोवेळा अतिशय सुंदर, मुलायम, अनेक वेगळ्या flavours चं icecream अगदी कंटाळा येईपर्यंत खाल्लं आहे. पण त्यावेळच्या फसलेल्या icecream ची आठवण काढत आम्ही अजूनही खूप हसतो. 
     मम्माला खाणे बनवण्याची आणि लोकांना खिलवण्याची जशी हौस आहे तशीच ते लोकांना शिकवण्याची सुद्धा आहे. त्यातूनच तिनी coocking class मधून अनेक विविध प्रकारच्या, देशी, विदेशी, पारंपारिक आणि पूर्णतः आधुनिक, स्वतः शोधून काढलेल्या अशा पाककृती शिकवायला सुरुवात केली. वर्षभर असे classes चालू असले तरी मे महिन्याच्या सुट्टीत ते जोरात चालत. माझ्या त्या classes च्या तर इतक्या मस्त आठवणी आहेत. दुपारी साधारण 1 वाजता हे class असायचे म्हणून त्याच्या आधी आम्ही आमची दुपारची जेवणं आटपायचो. म्हणजे अक्षरशः उगाच थोडसं काहीतरी खाऊन उरकायचो. त्या जेवणात माझं आणि दादाचं लक्षच नसायचं. आणि मग 3 वाजता class संपला आणि सगळे घरी गेले की मग अक्षरशः हॉटेल सारखं हवं ते order करून मस्त ताव मारता यायचा. तेव्हा सुट्टी असली की मी तिच्या कित्येक class मध्ये लुडबुड केलेली आहे. त्यातून मीही नकळत शिकत गेले. आता इथे अमेरिकेत मी स्वतः सुद्धा अनेक cuisines चे आणि मुख्य म्हणजे healthy food चे coocking class घेते ते मम्मा, बाबाच्या प्रोत्साहनामुळेच शक्य झालं आहे. 
     पदार्थ कशा पद्धतीनी बनवावेत, त्यात काय प्रमाणात घटक पदार्थ घालावेत, त्याची पौष्टिकता कशी वाढवावी, वेगवेगळ्या वयोगटातील लोकांच्या गरजेनुसार आहारात काय असावे, तो पदार्थ कसा खावा आणि एकूणच अशा प्रकाराने पदार्थ बनवण्याची सवय आपल्या रोजच्या जीवनशैलीचा भाग कशी करावी असा सगळा विचार अनेक लोकांपर्यंत पोचावा असे नेहेमीच मम्मा, बाबाला वाटते. त्याच विचारातून मागे काही वर्षांपूर्वी मम्मानी 'आम्ही सारे खवय्ये' या 'झी मराठी' वाहिनी वरच्या कार्यक्रमात काही अत्यंत नाविन्यपूर्ण, चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ दाखवले होते. नंतर मी आणि बाबा सुद्धा परत या कार्यक्रमात गेलो आणि अजून काही पदार्थ दाखवले त्याचे video तुम्ही पहिले असतील. या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत हा विचार पोचला. अजूनही कितीतरी लोक त्याबद्दल विचारत असतात. याशिवाय मम्मा, बाबा मिळून अनेक ठिकाणी पौष्टिक आहार, संतुलित जीवनशैली, व्यायाम, stress management यासारख्या असंख्य विषयांवर गेली अनेक वर्ष भाषणं देणे, workshop घेणे यासारखे उपक्रम करत असतात. त्यातून शाळेत जाणारी वाढत्या वयाची मुले, गर्भवती बायका, जेष्ठ नागरिक, नोकरी करणारे लोक अशा वेगवेगळ्या वयाच्या लोकांच्या विशिष्ठ गरजांचा विचार करून सल्ला देतात. शिवाय ते दोघे मिळून 'मराठी खाद्यसंस्कृती' नावाचा blog लिहितात. यात अनेक पारंपारिक, नाविन्यपूर्ण, पौष्टिक, चवदार पाककृती आणि त्या बनवण्यामागचा विचार तुम्हाला वाचायला मिळेल. 
     आजपर्यंत माम्माकडून शिकलेल्या अगणित पाककृती मी माझ्या 'किचन' मध्ये नेहमीच करत आले आहे. आज Mother's Day च्या निमित्ताने या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. आज मम्माच्या आवडीच्या कुठल्यातरी पदार्थाची पाककृती लिहावी असं मनात होतं पण तिच्या आवडीनिवडी काही नसल्या तरी अमुक एकच असा, तिला खूप आवडणारा पदार्थ तिला स्वतःला सुद्धा आठवणार नाही. त्यामुळे ती नेहमी करत असलेल्या आणि मीही तिच्याकडूनच शिकलेल्या माझ्या अत्यंत आवडीच्या कोथिंबीरीच्या वड्यांची पाककृती  मी आज सांगणार आहे. 




साहित्य: (साधारण 20 वड्यांसाठी)

2 कप निवडलेली कोथिंबीर, 3/4 कप हरभरा डाळीचे पीठ, 2 टीस्पून तीळ, 1/2 टीस्पून ओवा, 1/4 टीस्पून हळद, 1/4 टीस्पून तिखट, टीस्पून धन्याची पावडर, 1 टेबलस्पून तेल, टीस्पून लसूण पेस्ट, 1/2 टीस्पून आलं पेस्ट, 1/4 कप पाणी, चवीनुसार मीठ. 

(Ingradients: For 20 pieces
2 cup cilantro leaves, 3/4 cup chickpea flour, 2 teaspoon sesame seeds, 1/2 teaspoon ajwain /carom seeds, 1/4 teaspoon turmeric powder, 1/4 teaspoon chili powder, 1 teaspoon coriander powder, 1 tablespoon oil, 1 teaspoon garlic paste, 1/2 teaspoon ginger paste, 1/4 cup water, salt to taste) 



कृती: 




  • निवडलेली कोथिंबीर धुवून घ्या आणि बारीक चीरा. 
  • एका पातेल्यात पाणी तापत ठेवा. 
  • एका बाऊल मध्ये कोथिंबीर घ्या आणि त्याच्यात पाणी सोडून बाकीचे सर्व साहित्य टाका. हे सर्व कोरडे घटक नीट मिसळून घ्या. 
  • या मिश्रणात अंदाज घेत साधे पाणी मिसळा आणि त्याचा घट्ट गोळा तयार करा.
  • या गोळ्याचे दोन भाग करून त्याचे रोल करा. 
  • एखाद्या रोळीला (तळाला भोकं असलेले भांडे) थोडेसे तेल लावा आणि त्यात हे रोल ठेवा. 
  • तोपर्यंत पातेल्यातील पाणी तापले असेल. त्यावर रोळी ठेवा आणि वर झाकण ठेवा. 
  • अधून मधून रोल फिरावर रहा आणि सर्व बाजूनी एकसारखी वाफ मिळेल याची काळजी घ्या. 
  • रोल साधारण 20 मिनिटे वाफेवर शिजल्यावर बाहेर काढा आणि थंड होऊ द्या. गरम रोल कापायच्या प्रयत्नात त्याचे तुकडे पडू शकतात.










  • थंड झाल्यावर रोलच्या साधारण 1/2 सेमी च्या चकत्या कापा. फार पातळ चकत्या कापल्या तर वड्या कडक होतात. 
  • या वड्या तुम्ही deep fry किंवा shallow fry करू शकता. मी त्या शक्यतो मध्यम gas वर shallow fry करते म्हणजे कमी तेलात होतात. Gas फार मोठा ठेवलात तर वड्या करपू शकतील आणि फार बारीक gas वर केल्याने कडक होऊ शकतील.

 

(Directions:

  • Wash and finely chop cilantro leaves.
  • Boil water in a steamer.
  • Mix together all the dry ingredients with chopped cilantro leaves in a bowl.
  • Pour very little water and make a firm dough.
  • Divide the dough in 2 parts and make rolls.
  • Put them in a steamer and rotate them in regular interval to get cooked evenly from all sides.
  • Cook for approximately 20 min. Remove them from steamer and let them cool.
  • Cut the roll in to 1/2 cm slices. 
  • Deep fry or shallow fry on medium heat.)

     तर अशा या कोथिंबीरीच्या वड्या सगळ्यांनाच अतिशय आवडतात. या खुसखुशीत, चमचमीत वड्या कुठल्याही जेवणात side dish म्हणून एकदम शान आणतात आणि मुख्य जेवणाच्या आधी यांच्यावरच जास्त ताव मारला जातो. या करायलाही अतिशय सोप्या आणि पटकन होणाऱ्या आहेत. कोणी जेवायला येणार असेल तर अधीपासूनही करून ठेवता येतात. तुम्हीही करून बघा आणि कशा झाल्या ते नक्की कळवा.