प्रसंग 1:
दुपारच्या उन्हातून, खूप ट्राफिक मधून नुकतेच आपण घरी आलोय. तोंडावर थंडगार पाण्याचे हबके मारून, जोरात पंखा लावून जरा निवांत बसलोय. अजूनही तापलेलं डोकं काही थंड झाल्यासारखं वाटत नाहीये. गार पाण्याचे ग्लास वर ग्लास घशाखाली उतरले तरी अजून तहान भागात नाहीये. एवढं पाणी प्यायल्यावर आता जेवायची तर भूकच नाहीये. अशा वेळी थकलेल्या डोक्यात एक छान कल्पना येते...
प्रसंग 2:
आज मुद्दाम ठरवून जेवायला अगदी छान बेत केलाय. सकाळपासून सगळं सामान आणण्यापासून ते तयारी करण्यापर्यंत सगळं अगदी उत्साहात चालू आहे. नेहमीपेक्षा जरा वेगळे पदार्थ असल्यामुळे आज स्वयंपाक करायलाही खूप मजा येतीये. जेवायची वेळ झाल्यावर सगळे टेबलापाशी जमून गरमागरम जेवण अगदी मिटक्या मारत, आस्वाद घेत आणि chef चे कौतुक करत खाताहेत. जेवण झाल्यावर जरा निवांत बसलो तरी आत्ताच्या झणझणीत, चटकदार जेवणाची चव अजून जिभेवर रेंगाळतीये. अशा वेळी डोक्यात एक छान कल्पना येते...
प्रसंग 3:
मागचे बरेच दिवस अतिशय busy गेल्यानंतर आज खूपच दिवसांनी एक शांतसा weekend आला आहे. सकाळी उशीरा उठण्यापासूनच जरा आळस आला आहे. खिडकीतून बघितलं तर वाऱ्याच्या मंद झुळका येताहेत आणि बाहेरच्या वातावरणावरही एक निवांतपणा पसरला आहे. सगळा दिवस मनाच्या अशा एका तरल अवस्थेत घालवल्यावर खरंच खूप बरं वाटतंय. इतक्या दिवसानंतर असा एखादा निवांत weekend अगदी हवाच होता. संध्याकाळी शांतपणे गप्पा मारत बसलोय, एखादा मस्त movie बघतोय. अशा वेळी हा निवांतपणा साजरा करण्यासाठी डोक्यात एक कल्पना येते...
प्रसंग 4:
आज कित्येक वर्षांनंतर सगळे एकत्र जमले आहेत. मध्ये वारंवार गाठीभेटी होत नसल्या तरीही काही वर्षांपूर्वी एकत्र घालवलेले सुंदर दिवस मनात अजूनही ताजे आहेत. एकमेकांमधली नाती इतकी घट्ट आहेत त्यामुळेच मध्ये बराच काळ गेला असला तरी आज भेटल्यावर त्याची अजीबात जाणीवही होत नाहीये. जशीजशी अजून रात्र होतीये तशा गप्पा अधिकच रंगताहेत. प्रत्येकाकडे खूप काही नवीन सांगण्यासारखे आहे. शिवाय जुने गमतीदार किस्से आठवले तर मग तर हसण्याला नुसता पूर येतोय. बरीच रात्र झालीये आणि आता जेवूनही बराच वेळ होऊन गेलाय. अशा वेळी कुणाच्या तरी सुपीक डोक्यात एक छान कल्पना येते... Strawberry, blueberry ice cream with strawberry sauce |
आत्तापर्यंत ती कल्पना काय असणार याचा अंदाज आला असेलच. तुमच्याही डोक्यात हा विचार अनेकदा डोकावून गेला असेल. Ice cream... थंड, मुलायम, creamy, जिभेवर ठेवताच वितळणारे, घशापासून पोटापर्यंत आणि मनालाही गारेगार करणारे ice cream. या आणि अशासारख्या अनेक घटना साजऱ्या करायला ice cream सारखा दुसरा पदार्थ नाही. याच्या इतक्या अगणित flavours आहेत. शिवाय वर कुठले nuts, फळांचे तुकडे, सॉस, चॉकलेट घालायचे, मिल्कशेक मध्ये घालून मस्तानी करायची, केक, जेली, फळे घालून त्याचे trifle pudding सारखे काही dessert करायचे की नुसत्याच स्वादाचा आस्वाद घ्यायचा असे अनेक पर्याय असून शकतात. प्रत्येकाच्या आवडीनुसार त्यात बदल करता येतात. Ice cream म्हणजे बहुतेकांचा अगदी weak point असतो. तुम्ही माझ्यासारखे असाल तर कुठल्याही ऋतू मध्ये, दिवसातल्या कुठल्याही वेळेला ते खाऊ शकता.
Chocolate, vanilla ice cream bars |
आजकाल ice cream चे अनेक प्रकार विकत मिळतात. पण तरी मी अनेकदा ते घरी करते. याला अनेक कारणे आहेत. एकतर घरी आपण स्वतः करण्याचा आनंद मिळतो. त्यात अनेक नवीन प्रयोग करून तुमची स्वतःची अशी काही नवीन combinations करू शकता. मला स्वतःला बाहेरच ice cream जरा जास्त गोड, फेसाळ आणि त्यामुळेच थोडं कमी थंड वाटतं. शिवाय बाहेरच्या ice cream मध्ये ज्या प्रमाणात क्रीम असतं त्यामुळे ते वारंवार खाऊ शकत नाही. त्यामुळे घरी ice cream करण्याची मज्जाच वेगळी.
चला तर मग याची सोपी रेसिपी बघूया.
साहित्य:
2 कप (1/2 लिटर) दूध, 1/2 कप क्रीम, 1/3 कप साखर (फळांचा पल्प वापरणार असाल तर 1/4 कप साखर), 1 1/2 टी स्पून कॉर्न स्टार्च, 1 चिमूट GMS powder, 1 चिमूट stabilizer powder
विविध flavours बनवण्यासाठी: (खालीलपैकी काहीही)
1/2 कप फळांचा पल्प, 1 टी स्पून vanilla extract, 1 टेबल स्पून कोको पावडर, 2 टी स्पून instant coffee पावडर, 1/4 कप घरी बनवलेला स्ट्रॉबेरी सॉस, 1 टेबल स्पून काजू, पिस्ता, बदाम यांची भरड पावडर, 2-3 चिमूट केशर, 1/4 टी स्पून वेलदोडा पावडर यापैकी काहीही.
सजावटीसाठी:
ताज्या फळांचे तुकडे, nuts, किसलेले चॉकलेट, चॉको चिप्स, rainbow sprinkles, स्ट्रॉबेरी सॉस, चॉकलेट सॉस.
Ingredients: 2 cup( 1/2 liter) milk, 1/2 cup heavy cream, 1/3 cup sugar (1/4 cup sugar if using fruit pulp), 1 1/2 teaspoon cornstarch, 1 pinch GMS powder, 1 pinch Stabilizer powder.
For different flavours: (anything from list below)
1/2 cup fruit pulp, 1 teaspoon vanilla extract, 1 tablespoon cocoa powder, 2 teaspoon instant coffee powder, 1/4 cup homemade strawberry sauce, 1 tablespoon coarse nut powder, 2-3 pinches of Kesar, 1/4 teaspoon cardamom powder.
For Garnishing:
fresh fruites pieces, nuts, grated chocolate, chocochips, rainbow sprinkles, strawberry sauce, chocolate sauce
कृती:
- खोलीच्या तापमानाच्या निम्म्या दूधात कॉर्न स्टार्च घालून गुठळ्या होणार नाहीत अशा प्रकारे नीट मिसळा.
- ते मिश्रण उकळा आणि त्यात साखर घाला.
- मिश्रण जरा थंड झाले की त्यात उरलेले दूध, क्रीम, GMS आणि stabilizer powder आणि वरीलपैकी कुठलीही flavour घाला आणि मिक्सर मधून काढा. कुल्फी करायची असल्यास शिवाय 1/4 कप खवा घाला किंवा आटवलेलं दूध वापरा.
- Ice cream maker असेल तर मिश्रण त्यात टाकून घट्ट होऊ द्या.
- नसेल तर मिश्रण फ्रीजर मध्ये ठेवा. अर्धवट घट्ट झाले की परत मिक्सर मधून काढा आणि फ्रीजर मध्ये ठेवा. ही कृती 2-3 वेळा करा. यामुळे ice cream मध्ये बर्फ न लागता ते एकसारखे मुलायम लागते.
- Ice cream खाण्यापूर्वी 2 मिनिटे आधी फ्रीजर मधून काढून ठेवा म्हणजे त्याचा छान गोळा बनेल.
- सजावटीसाठी वरून ice cream च्या flavour नुसार आणि तुमच्या आवडीनुसार ताज्या फळांचे तुकडे, nuts, किसलेले चॉकलेट, चॉको चिप्स, rainbow sprinkles, स्ट्रॉबेरी सॉस, चॉकलेट सॉस यापैकी काहीही घालून त्याचा आस्वाद घ्या.
Directions:
- Add cornstarch in half of the room temperature milk and mix well to avoid lumps.
- Boil this mixture and add sugar.
- Let it cool and then add remaining milk, heavy cream, GMS and Stabilizer powder and any flavour ingredient and blend it in blender. To make Kulfi add 1/4 cup Mawa or use thickened milk.
- If you have ice cream maker pour this mixture in it to set.
- Otherwise put it in a freezer. Blend it again when half set and put it in a freezer. Repeat this 2-3 times to get ice free soft consistency.
- Remove ice cream from freezer 2 minutes before serving to get nice scoop.
- Garnish it with fresh fruites pieces, nuts, grated chocolate, chocochips, rainbow sprinkles, strawberry sauce, chocolate sauce etc. according to the flavour of ice cream and your choice.
हे ice cream केल्याकेल्या इतकं मस्त दिसत असलं तरी ते घट्ट होईपर्यंत त्याची वाट बघत, टुकत बसावे लागणार. तयार झाल्यावर याचा एक चमचा तोंडात टाका आणि तो मधूर, थंडगार अनुभव मनात साठवत रहा. एकदा हे ice cream तुम्ही खाल्लेत की बाहेरच्या आणि घरी केलेल्या ice cream मधला फरक तुम्हालाच जाणवेल आणि तुम्ही नक्की वारंवार घरीच कराल. ही कृती काही फार अवघडही नाही. तुम्ही हे मुलांबरोबर करू शकाल. त्यांच्या आवडीचा पदार्थ त्यांनी बनवला याचा त्यांनाही आनंद होईल. शिवाय आपण यात नक्की काय काय आणि किती प्रमाणात घातलाय हे तुम्हाला माहीत असल्यानी तुम्ही ते योग्य प्रमाणात खाऊ शकाल. एकदा ice cream करून फ्रीजर मध्ये ठेऊन द्यायचं आणि अधून मधून वाटीत थोडंसं घेऊन त्याचा आस्वाद घ्यायचा यासारखं दुसरं सुख नाही. मग कुठला प्रसंग ice cream नी रंगतदार करताय? कसं बनलं ते मला कळवायला विसरू नका.
Alphonso Mango ice cream with fresh mango pieces |
Cashew, Almond, Keshar Kulfi |
Dark Chocolate ice cream with chocolate sauce |
Wow. Hearty and WARM introduction; informative and COOL recipe and superb and MOUTHWATERING presentation. Feeling COOL AND CONTENTED just be reading.
ReplyDeleteMastach malavika.. mumbai chya climate la he atyantik garjecha aahe ;)
ReplyDelete:) thanks for reading and for complements. Can you please tell me your name. I could not recognize from your initials.
DeleteNot only the icecream looks good but the presentation too is excellent.
ReplyDeleteThanks Kaka :)
Delete