Wednesday, March 7, 2018

ब्रेड पिझ्झा

     सध्याच्या आपल्या lifestyle मध्ये पिझ्झा हा पदार्थ आपल्या जेवणात वारंवार येणारा असला तरी मी लहान असताना पिझ्झा फारसा लोकप्रिय नव्हता. कित्येकांना तो माहितही नसायचा किंवा माहित असलाच तरी खाल्लेला तर नसायचाच. नंतर काही वर्षांनी भारतात Pizza Hut सारखे outlets सुरु झाले आणि हळू हळू पिझ्झा सर्वाना माहिती होऊ लागला. अर्थात तेव्हा तो अतिशय महाग मिळायचा आणि त्याचमुळे असेल कदाचित त्याचं सगळ्यांना फार अप्रूप असायचं. 
        मी असा अगदी मोजक्या वेळा तिथे जाऊन पिझ्झा खाल्लेला मला आठवतो. पण असे outlets येण्याच्या बराच आधीपासून मी पिझ्झा खाल्लेला होता. तेव्हा त्याचे ready made base मिळायला लागले होते. पण ते वाई सारख्या लहान गावात मिळत नसत. त्यामुळे कधी क्वचित पुण्याहून base आणले तर पिझ्झा बनवता यायचा. नेमकं पिझ्झा वर काय काय असतं हे नीट माहित नसल्यामुळे तेव्हा घरात त्यावर बरेच प्रयोग व्हायचे. त्यामुळे तेव्हा खूप वेगवेगळ्या toppings चे पिझ्झा खाल्ले. 
       त्याच सुमारास आमच्या घरी TV आला आणि दूरदर्शन सोडून अनेक चॅनेल्स लागायला लागले. तेव्हा संजीव कपूर यांचा 'खाना खजाना' नुकताच चालू झाला होता. त्यात त्यांनी एकदा पिझ्झा dough बनवून त्याचा base कसा बनवायचा हे दाखवलं होतं. त्यानुसार मग मम्मा घरी from the scratch असा पिझ्झा बनवायला लागली. त्याची एकदा गंमत झाली होती. मामानी पहिल्यांदाच असा dough घरी बनवला. त्याची कृती थोडी वेळखाऊ होती आणि त्यातून तिनी पहिल्यांदाच बनवला असल्यानी तयारीत खूप वेळ गेला होता. शेवटी संध्याकाळी जेवण्याच्या वेळी ती पिझ्झा बनवायला लागली. तेव्हा बाबा बाहेर गेला होता. मी आणि दादा जेवायला बसलो. प्रयोग करत करत शेवटी पिझ्झा बनला. पहिल्यांदाच बनवला असला तरी खूपच मस्त बनला होता. आणि विकतचे base आणून केलेल्या pizza पेक्षाही खूपच मस्त बनला होता. मी आणि दादा मस्त जेवलो. मग बाबा आल्यावर मामानी परत पिझ्झा बनवला पण असा पहिल्यांदाच घरी बनवल्यामुळे मम्माचा अंदाज जरा चुकला होता. या नवीन पिझ्झा वर toppings, sauce, cheese सगळंच अगदी बेतानी घातलं गेलं होतं. आज नवीन प्रयोग केला आहे त्याचे analysis करूया या बाबाच्या स्वभावानुसार त्यानी पिझ्झा खाल्यावर तो म्हणाला, "पिझ्झा ठीक झाला आहे पण यात काहीच नाहीये." आणि असं म्हणाल्यावर मम्मा एकदम हताश झाली की, "सकाळपासून तयारी करूनही हा म्हणतोय की यात काहीच नाही?"
       त्यानंतर आजपर्यंत अनेक वेळा घरी पिझ्झा केला. त्यात dough चे, sauce चे, toppings चे अनेक प्रयोग केले. मागे एकदा 'आम्ही सारे खवय्ये' मध्ये जाऊन पदार्थ दाखवण्याची संधी मिळाली तेव्हा त्यातही मी वेगळ्या प्रकारचा स्वीट पिझ्झा करून दाखवला. इथे अमेरिकेत कुठेही बाहेर किंवा पार्टी मध्ये गेल्यावर पिझ्झा नाही असे होत नाही आणि त्याचे इथे कितीतरी options आहेत. असं असूनही मी अनेकदा घरी पिझ्झा करते. माझ्या मुलांनाही मधे मधे लुडबुड करत मला मदत करायला आवडतं त्यामुळे ते जेवण आम्ही सगळ्यांनी एकत्र बनवलेलं असतं आणि त्यात खूप मज्जा येते. मम्मानी पहिल्यांदा पिझ्झा घरी बनवला त्याला आता इतकी वर्ष झाली आणि त्यानंतर कितीतरी वेळा अगदी मस्त झालेल्या पिझ्झा वर आम्ही अक्षरशः ताव मारलेला आहे पण तरीही प्रत्येक वेळेला त्या पहिल्या पिझ्झाची आठवण होते आणि "पिझ्झा मस्त बनलाय पण यात काहीच नाही." असं म्हणून आम्ही मम्माला नेहमी चिडवतो.
     मी from the scratch dough बनवून किंवा तयार dough आणून अनेकदा घरी पिझ्झा करते. तसाच काही वेळा ब्रेड पिझ्झा पण करते. हा करायला अगदीच सोपा आणि कमी वेळात होतो. चला तर मग याची रेसिपी बघूया. 

साहित्य:
6 bread slices, 1 ढब्बू मिरची, 1 कांदा, 4-5 मशरूम, 1/2 कप किसलेले चीज, 
1/4 वाटी टोमॅटो सॉस, लोणी, मिरेपूड, ओरेगॅनो.


Ingredients:
6 slice of bread, 1 green pepper, 1 onion, 4-5 mushrooms, 1/2 cup shredded cheese, 1/4 cup tomato sauce, butter, black pepper powder, oregano. 


कृती:



  • ढब्बू मिरची आणि कांदा बारीक चिरून घ्या. मशरूमचे काप करा.  
  • ओव्हन 375 deg F (190 deg C) ला preheat करा. 
  • एका ट्रे मध्ये ब्रेड चे slices मांडा. 
  • त्यावर लोणी आणि नंतर टोमॅटो सॉस लावा. 
  • त्यावर बारीक चिरलेली ढब्बू मिरची, कांदा आणि मशरूमचे काप नीट पसरा. 
  • त्यावर किसलेले चीज घाला. 
  • वरून मिरेपूड, ओरेगॅनो घाला आणि ओव्हन मध्ये 20 मिनिटे बेक करा. 




Directions:
  • Dice green pepper and onion and slices mushrooms. 
  • Preheat oven at 375 deg F (190 deg C)
  • Arrange bread slices in a tray.
  • spread butter and then tomato sauce on them.
  • Put diced green pepper, onion and sliced mushrooms. 
  • Sprinkle cheese.
  • Sprinkle black pepper, oregano and bake it oven for 20 minutes.





       पिझ्झा होत आला की त्याचा खमंग वास सगळीकडे पसरेल. वितळलेल्या आणि golden brown झालेल्या चीज मध्ये लागणारे भाज्यांचे तुकडे प्रत्येक घासाला वेगवेगळ्या स्वादाचा अनुभव देतील. यात topping म्हणून olives, अननसाचे किंवा सफरचंदाचे तुकडे, पालकची पाने, मक्याचे दाणे, किसलेले गाजर, पनीर, चिकन, अंडा भुर्जी यासारखे पदार्थ वापरता येतात. हे पिझ्झा आकाराने लहान असल्यामुळे प्रत्येक पिझ्झा एकट्यापुरता, आपापल्या आवडीनुसार बनवता येतो. याचा आस्वाद सकाळच्या नाश्ताला, संध्याकाळी चहाबरोबर किंवा जेवायला असा कधीही घेता येईल. हा ब्रेड पिझ्झा नक्की घरी करून बघा आणि
मला कसा झाला ते कळवा. 

No comments:

Post a Comment