मला अगदी सुरवातीलाच हे सांगायला आवडेल की हा पदार्थ मी माझ्या दादाकडून शिकले आहे. असं आधीच सांगण्याचे दोन उद्देश आहेत. एक म्हणजे दादा हे sandwich इतकं मस्त बनवतो की त्याचे credit त्याला जरूर द्यायलाच पाहिजे. आणि दुसरं कारण म्हणजे नाहीतर मला पुढे कित्येक महिने, "तू माझी recipe ढापलीस." असं त्याच्याकडून खूप चिडवून घ्यावं लागलं असतं. ज्यांना मोठा भाऊ असेल त्या सगळ्यांना हे चिडवणं कसं असतं हे नक्कीच कळेल.
लहान असल्यापासून दादा करतो ते सगळच नेहमी बरोबर असतं अशी माझी एक समजूत झाली होती. त्यामुळे कुठल्याही गोष्टीत त्याच्यावर प्रचंड विश्वास. आम्ही चिक्कार भांडायचो पण जेव्हा कधी काही कारणानी मम्मा, बाबा बाहेर गेलेत आणि आम्ही दोघेच घरी आहोत अशी परिस्थिती निर्माण व्हायची तेव्हा तो एकदम जबाबदारीने माझी काळजी घ्यायचा आणि मी पण तो म्हणेल ते निमूट ऐकायचे.
एकदा एका संध्याकाळी मम्मा रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. पालेभाजी करायची म्हणून लसूण सोललेला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळची शाळा म्हणून ब्रेड आणलेला होता. आणि अचानक बाबाकडे delivery ची case आली आणि बाबा, मम्मा लगेच हॉस्पिटल मध्ये गेले. आमचं जेवण झालं नव्हतं. मग दादानी त्याचं सुपीक डोकं चालवलं आणि सोललेल्या लसणाची चटणी केली. बरं, तोही तसा लहान होता त्यामुळे त्याला मिक्सर चालवता येत नव्हता म्हणून त्यानी हातोडी काढली. ती स्वच्छ धुऊन घेतली आणि त्यानी लसूण कुटला. मग आम्ही ब्रेड बरोबर लसूण चटणी असं मस्त जेवण केलं. घरी आल्यावर मम्माला त्याचा हा पराक्रम कळल्यावर, "at least हा कधी उपाशी राहणार नाही." हे बघून हुश्श झालं.
नंतर एकदा मी आठवीत असताना माझी चित्रकलेची elementary परीक्षा होती. आणि त्याच वेळी माझे आजोबा आजारी असल्यामुळे आम्ही सगळे पुण्याला होतो. माझी परीक्षा बुडू नये म्हणून मी आणि दादा दोघेच वाईला आलो. आणि परीक्षा झाल्याच्या दुसऱ्या दिवशी परत लगेच पुण्याला गेलो. पण तेवढे दोन दिवस दादानी माझी पूर्ण काळजी घेतली. एरवी इतके भांडणारे आम्ही, अशी वेळ आली की इतक्या प्रेमाने वागायचो. ते दोन्हीही दिवस दादा मला मस्त डबा तयार करून देत होता. आणि ते सगळे पदार्थ त्याच्या डोक्यातूनच आलेले असावेत कारण मम्मा तसे कधी करायची नाही.
तर आज त्याची recipe लिहिण्याच्या निमित्ताने मला त्यानी आजपर्यंत अनेकदा करून खायला घातलेले पदार्थ आठवले. मी अमेरिकेत आल्यावर पहिले चार महिने दादाची family, मी आणि तेजस असे आम्ही सगळे एकत्र राहत होतो. आणि नंतरही जवळपास एक वर्ष काही तासांच्या अंतरावर राहत होतो. त्यामुळे आम्ही सगळे अधूनमधून भेटायचो. आणि भेटल्यावर काय काय खायचे याचेच plans जोरदार असायचे. त्यावेळी प्रत्येकजण आपापली specialty dish करायचा. गम्मत म्हणजे दादानी केलेले पदार्थ एकदम सोप्पे वाटायचे आणि आम्ही परत घरी आल्यावर ते करून बघायचो पण ते कधीच त्यानी केलेल्या पदार्थासारखे व्हायचे नाहीत. कुठेतरी प्रमाणात कमी जास्त होत असेल किंवा 'एखाद्याच्या हाताची चव' म्हणतात तसा प्रकार असेल. पण दादाचे tomato rice, chicken steamboat असे काही खास पदार्थ त्यानी केलेलेच मस्त लागतात.
तर असाच खास त्याचा हा पदार्थ Croissant Chicken Sandwich. हा आम्ही अनेकदा केला आणि तो बराचसा दादासारखा जमलाय. म्हणून तुम्हालाही ही recipe सांगते. घरी नक्की करून बघा आणि कसा झाला ते जरूर कळवा.
साहित्य: 2 Sandwiches साठी
आता या मस्त गरमा गरम Croissant Chicken Sandwich चा भरभरून आस्वाद घ्या. यात चिकन ऐवजी पनीर चे तुकडेही घालू शकता. त्यात पनीरही marinate करून लोण्यावर परतून घ्या. ह्या Sandwich ला अगदी कमी साहित्य लागते आणि अगदी पटकन बनते. शिवाय 2 रंगांच्या ढब्बू मिरचीमुळे दिसायला एकदम आकर्षक दिसते. तर असे हे झटपट बनणारे आणि जिभेचे सगळे चोचले पुरवणारे Croissant Chicken Sandwich नक्की करून बघा.
200 ग्रॅम बोनलेस चिकन, 1 वाटी मोठे तुकडे केलेली 2 रंगांची ढब्बू मिरची, 1 वाटी मोठे तुकडे केलेला कांदा, 1-2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, 1 टेबल स्पून बारीक चिरलेला लसूण, पाव टी स्पून तंदूर चिकन मसाला, अर्धा टी स्पून लिंबाचा रस, 2 टी स्पून लोणी, 1-2 टी स्पून tomato चिली सॉस (जर tomato ketchup असेल तर शिवाय अर्धा टी स्पून साखर), किसलेले चीज, 2 Croissants (हे नसल्यास पाव भाजी चा ब्रेड किंवा ब्रेडचे स्लाईस), चवीनुसार मीठ.
कृती:
- चिकनचे छोटे तुकडे करून त्यात तंदूर चिकन मसाला, लिंबाचा रस आणि मीठ घालून 15 मिनिटे marinate करा.
- कढईत अगदी थोडे तेल घ्या आणि त्यात 1 टी स्पून लोणी घाला. (असे केल्याने लोणी जळत नाही.)
- लोणी वितळले की त्यात बारीक चिरलेला लसूण घालून परता. लसणाचा रंग थोडा brown झाला की बारीक चिरलेली मिरची घाला.
- त्यात कांदा घालून थोडासा परतून घ्या आणि मग ढब्बू मिरची आणि मीठ घाला. कांदा आणि ढब्बू मिरची अगदी थोडी शिजवा.
- त्यात tomato चिली सॉस घाला. नीट मिक्स करा आणि बाजूला काढून ठेवा.
- कढईत परत किंचित तेल घेऊन त्यात उरलेले 1 टी स्पून लोणी घाला. लोणी वितळले की त्यात चिकन घाला आणि शिजेपर्यंत चांगले परतून घ्या. चिकनला थोडे पाणी सुटेल. यात शिजण्यासाठी वेगळे पाणी घालू नका.
- चिकन शिजले की त्यात मगाशी बनवलेली कांदा आणि ढब्बू मिरचीची भाजी घालून नीट मिक्स करा.
- Croissant मधून अर्धा कापा आणि त्यात हे सारण भरा. वरून किसलेले चीज टाका आणि Croissant बंद करून microwave oven मध्ये 30 सेकंद गरम करा. यामुळे आतले चीज वितळेल आणि Croissant गरम होईल.
आता या मस्त गरमा गरम Croissant Chicken Sandwich चा भरभरून आस्वाद घ्या. यात चिकन ऐवजी पनीर चे तुकडेही घालू शकता. त्यात पनीरही marinate करून लोण्यावर परतून घ्या. ह्या Sandwich ला अगदी कमी साहित्य लागते आणि अगदी पटकन बनते. शिवाय 2 रंगांच्या ढब्बू मिरचीमुळे दिसायला एकदम आकर्षक दिसते. तर असे हे झटपट बनणारे आणि जिभेचे सगळे चोचले पुरवणारे Croissant Chicken Sandwich नक्की करून बघा.
wow! very tempting. a tribute to dada. hum!?
ReplyDeletewe will try on this Sunday. with simple bread of course. and both veg and non-veg versions.
but we haven't had the opportunity to taste his other specialties like 'tomato rice' & 'chicken steamboat'.
खूऊऊऊऊऊऊऊऊपच मस्त झाले आहे दोन्हीही त्याची रेसिपी तर नेहमीप्रमाणे मस्त झालीच आहे पण दादाबद्दल लिहिलेले ही फ़ारच सुंदर झाले आहे अगदी सोप्या आणि साध्या शब्दात आणि खूऊऊऊऊऊऊऊऊऊऊप प्रेमाने भरलेले मस्त मस्त
ReplyDeletefarach chaan.jaroor karun baghen.
ReplyDelete